|
|
|
|
अनुभव विषयी...
"अनुभव'हे "युनिक
फीचर्स'मार्फत प्रकाशित होणारं मासिक. वृत्तपत्रांचं बदलतं स्वरूप, नियतकालिकांच्या
आशयात आलेला पाताळपणा आणि सजग वाचकांसाठी चांगलं माध्यमच न उरणं या पार्श्वभूमीवर "अनुभव'चं
प्रकाशन सुरू केलं गेलं. आज घडीला "अनुभव' हे मराठीतील अव्वल क्रमांकाचं निमगंभीर
मासिक बनलं आहे... आपला भवताल समजून घेण्याचं माध्यम बनलं आहे. "अनुभव'मध्ये हाताळले
जाणारे विषय, घटना-घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नवे लेखक-कवी-पत्रकार
हुडकून त्यांच्याकडून चांगलंचुंगलं लिहून घेण्याचा प्रयत्न यांमुळे "अनुभव'चा दबदबा
वाढत आहे. दैनिकांच्या गर्दीत, चॅनेल्सच्या भाऊगर्दीत आणि चटपटीत साप्ताहिकांमध्ये चांगल्या वाचकाला खरोखर वाचायला किती मिळतं? "अनुभव' मध्ये मात्र प्रत्येक पान वाचकासाठी असतं. वाचकाचं अनुभवविश्व विस्तारावं, नव्या जगाचं भान त्याला यावं यासाठी खास प्रयत्न केला जातो. वाचकाला जे हवं आहे त्याचा पुरवठा करण्याच्या आजच्या जमान्यात "अनुभव' मात्र वाचकाला विविध विषयात मुशाफिरी करायला घेऊन जातो. आमच्या या साऱ्या प्रयत्नांना दाद देणारा एक पुरस्कार "अनुभव'ला मिळाला. एकेकाळी महाराष्ट्रात नवविचारांचं वारं फिरवणाऱ्या शं.वा.किर्लोस्कर यांच्या नावाने दिला जाणारा "शंवाकि पुरस्कार' मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या हस्ते "अनुभव'ला दिला गेला आहे. "तुमच्या लेखक-वाचकांना तुमच्याबद्दल प्रेम आहेच, पण साऱ्या महाराष्ट्राला आज तुमच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो," अशा शब्दात मुकुंदराव किर्लोस्कर यांनी "अनुभव'बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. "अनुभव' हे जाहिरातीचं माध्यम म्हणून वापरणाऱ्या आमच्या जाहिरातदारांना आम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त अशा काही योजना विनामोबदला राबवतो. वाचकांना चांगल्या मजकुराबरोबरच नामवंतांच्या जाहिराती पहायला मिळतात आणि जाहिरातदारांना मिळतो मराठीतला एलिट क्लास. या साऱ्या प्रयत्नांमुळेच "अनुभव' बनलंय सर्वाधिक खपाचं निमगंभीर वाचनीय मासिक. आणि म्हणून अनेक लोकप्रिय ब्रॅन्डस् अनुभवमध्ये आवर्जून जाहिरात करतात. "युनिक फीचर्स'ने लावलेलं "अनुभव'नावाचं रोपटं आता मोठं झालं आहे नि बहरू लागलं आहे, याच्या या साऱ्या खाणाखुणा आहेत.
वाचनसंस्कृती संवर्धनासाठी..
एक
चळवळ.. जे चांगलं ते लिहितं करण्यासाठी..! आपल्या समाजात टोकाच्या घटना घडत आहेत. गेल्या काही वर्षात एका वर्गाचे दिवस पालटून गेले आहेत. देशाच्या नव्या अर्थव्यवस्थेचे भरघोस फायदे त्यांना मिळताहेत. त्यातून सुबत्ता, स्थैर्य आलंय. सुखाचा शोध चालू आहे. खिशातल्या पैशाचं काय करू नि काय नको, अशी अनेकांची अवस्था झालीय. पण त्याचवेळेस अनेकजण अस्वस्थ आहेत. त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. गुदमरल्यासारखं वाटतंय. कामाचं स्वरूप, बदलती जीवनशैली, त्यातून निर्माण होणारे ताण, बदलती कुटुंबं, बदलते नातेसंबंध, अशा अनेक कारणांमुळे माणसांमध्ये चलबिचल आहे. एक ना अनेक कारणांमुळे आपल्या मुळांपासून उखडल्याची जाणीव त्यांना होतेय... आपल्या समाजाबद्दल, त्याच्या बथ्थडपणाबद्दल अनेकजण उद्विग्न झालेत. पण चिडचिड करण्यापलीकडे कुणाला मार्ग सापडत नाहीये. आपण निघालोय खरे, पण पलिकडचं टोक दिसत नाही अशी अवस्था निर्माण झालीय... संवेदनशील माणसांबाबत असं काहीबाही होतंय!
दुसरीकडे, एक मोठा वर्ग
विपन्नावस्थेत जगतोय. त्याची आहे नाही ती जगण्याची साधनं हिसकावून घेतली जात आहेत.
नव्या अर्थव्यवस्थेत एकतर त्याला स्थान नाही किंवा फुटकळ कामांवर जगण्याची
त्याच्यावर सक्ती आहे. छोटा कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कारागीर,
बाराबलुतेदार, असंघटित क्षेत्रातील कामगार वगैरे लोक कशाबशा जगण्याच्या नि टिकून
राहण्याच्या मागे आहेत. आपलं काय होणार याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. आपल्या
पोराबाळांचं भवितव्य काय, या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढी उसंत लागते, तेवढीही
त्यांच्या नशिबी नाही.
संपर्क करा.. hidden hit counter
Contact Information
|
|
Send mail to eanubhav@eanubhav.com &
uniquefeatures@gmail.com with
questions or comments about this web site.
|